पूर्व लडाखमधील परिस्थिती गंभीर- परराष्ट्रमंत्री

Minister-of-Foreign-Affairs
Minister-of-Foreign-Affairs
Updated on

नवी दिल्ली- मागील काही महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद चांगलाच विकोपाला गेला आहे. भारताकडून याला उत्तर म्हणून भारताने मागील आठवड्यात चीनच्या 118 ऍपवर बॅन केलं होतं. यास चीनकडूनही (china) भारताला प्रत्यूत्तरही आलं होतं. या पार्श्वभूमीवर लवकरच भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S Jaishankar) चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी (Wang Yi) यांच्याशी मॉस्कोमध्ये चर्चा करणार आहेत. यावर भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पूर्व लडाखमधील परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे म्हटलं आहे. जयशंकर पुढे म्हणाले की, अशा परिस्थितीत दोन्ही बाजूंच्या राजकीय पातळीवर विचार करणे गरजेचे असून विचारपूर्वक चर्चा झाली पाहिजे. एस जयशंकर यांनी एका दैनिकच्या संवाद सत्राला संबोधित करताना असं वक्तव्य केलं आहे. आपल्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘इंडिया वे’ या पुस्तकाचा संदर्भ देताना ते म्हणाले, “सीमा परिस्थितीला दोन्ही देशातील संबंधाला वेगळे म्हणून पाहिले जाऊ शकत नाही. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी गलवानमधील दुर्दैवी घटनेपूर्वी हे पुस्तक लिहिलं आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पूर्व लडाखच्या गालवान खोऱयात 1 जून रोजी झालेल्या संघर्षात २० भारतीय सैन्य जवान शहीद झाले होते. यानंतर वास्तविक नियंत्रण रेषेवरील (Line of Actual Control) तणाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. यामध्ये चिनी सैनिकही मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते चीनने अधिकृतरित्या त्यांचा तपशील दिला नाही. महत्वाचे म्हणजे अमेरिकेच्या गुप्तचर अहवालानुसार गलवानमधील संघर्षात 35 चिनी सैनिकही मारले गेले होते, पण चीन यास नकार दिला होता. तसेच जयशंकर पुढे म्हणाले, जर सीमेवर शांतता नसेल तर दोन्ही देशातील इतर संबंधावरही मोठा परिणाम होऊ शकतो.

शांघाय सहकार संघटनेच्या (एससीओ) परराष्ट्र मंत्र्यांच्या 10 सप्टेंबर रोजी मॉस्को येथे होणाऱ्या बैठकीच्या वेळी जयशंकर वांग यांची भेट घेण्याची शक्यता आहे. आपल्या चिनी समकक्षाला कोणता संदेश देणार असे विचारले असता जयशंकर म्हणाले, " मी त्यांच्याशी काय बोलेन ते तुम्हाला सांगू शकत नाही." एस जयशंकर पुढे म्हणाले की, सीमेवर शांतता कायम ठेवण्याच्या व्यापक तत्त्वांवर चीनचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जाईल, जेणेकरून मागील 30 वर्षांच्या शांततापुर्ण संबंधांचा सर्वांगीण विकास होईल.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 एस जयशंकर 1993 पासून दोन्ही देशांमधील सीमा व्यवस्थापनावर झालेल्या अनेक कराराबाबत बोलले.  ते म्हणाले की, दोन्ही देशात अशी स्पष्ट अट आहे की सीमेवर सैन्यांची पातळी किमान असेल, जर तसे झाले नाही तर फार गंभीर प्रश्न उद्भवतात. यावर्षीच्या मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच दोन्ही देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com